- Waki वाकी
- Nagband नागबंद
- Nagotra नागोत्र
- Bajuband बाजूबंद
- Toleband तोळेबंद
- Wela वेळा
स्त्रियांमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारा हा दंडावरचा दागिना आहे. नागर उच्चवर्णीय स्त्रियांच्या वाकी सोन्याच्या, नाजूक घडणीच्या अशा असतात. तर ग्रामीण समाजात ठोसर व चांदीच्या वाकी आढळतात. सोन्याच्या वाकीमध्ये चटईच्या वाकी व रूद्रगाठीच्या वाकी असे दोन प्रकार महिलांचे विशेष आवडते आहेत.
चटईच्या वाकीसारखीच जडणघडण असणारा हा भक्कम असा चांदीचा अलंकार ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहे. It is mostly popular in Villages
जाडजूड आणि विशेष कलाकुसरीचा चांदीचा अलंकार तोळेबंदासारखाच ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहे. आदिवासी स्त्रियांमध्येही या अलंकाराचा पुष्कळच प्रसार झालेला दिसतो. It is thick and looks more like Toleband. It is also famous in Tribal women and in villages
4. Nagotra नागोत्र
गोल गोल वेटोळय़ांची भरपूर रुंदी लाभलेल्या या गोलाकार वाकीला नागोत्र असे नाव आहे. ग्रामीण व नागर या दोन्ही भागात हा अलंकारासारखाच लोकप्रिय आहे. शहरी भागात हे नागोत्र सुवर्णाचं आणि नाजूक कलाकुसरीचं असतं. ग्रामीण भागात ते ठसठशीत व चांदीचं आढळतं आणि नागोत्तर या नावाने ओळखलं जातं.
This is also like nagband but a bit different
5. Bajuband बाजूबंद
हा सुरेख घडणीचा, सुवर्णाचा रत्नजडित असा दंडावरचा अलंकार आहे. तथापि हा बहुतकरून शहरी भागातच दिसून येतो.
6. Nagband नागबंद
वेटोळे घालून बसलेली व फणा उभारलेली अशी सोन्याच्या नागकृतीच्या रचनेची वाकी ‘नाग’ अथवा ‘नागबंद’ अशा नावाने ओळखली जाते.